पिंपरी -कामगार राज्यमंत्री बच्चू कडू सकाळी मोरवाडी येथील अपंग भवनला भेट देऊन, सुरू असलेल्या बांधकामाची महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेत, काही सूचना केल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे अपंग भवनाची उभारणी केली जात आहे. 16 गुंठे जागेत तीन मजली सुसज्ज अपंग भवनात दिव्यांग बांधवांकरिता विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थि राहून जात असताना, बच्चू कडू यांनी या भवनाला मंगळवारी (दि.1) भेट दिली.
यावेळी महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगड, समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, महिला शहराध्यक्षा संगिता जोशी-काळभोर, ज्ञनदेव नारखेडे, रेवननाथ कर्डीले, सागर सुपल, सारिका रजपूत, कोमल तांदळे, अमित तारे, धीरज नागे उपस्थित होते.