मुंबई – सेलिब्रेटींचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक होण्याच्या बातम्या आपल्या कानावर अधुनमधून पडत असतात. त्यामुळे सेलिब्रेटींच्या नावे अनेकांना धमक्या किंवा वादग्रस्त वक्तव्य करण्यात येते. त्यामुळे गदारोळ होतो. आता मात्र महाविकास आघाडीतील पाणी पुरवठा व स्वच्छता कॅबिनेटमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे.
गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. यामध्ये त्यांच्या प्रोफाईल फोटोवर अज्ञात व्यक्तीचा फोटा दिसत आहे. मात्र कव्हर फोटो त्यांचा कायम आहे. गुलाबराव पाटील यांचे अकाउंट व्हेरीफाईड असून १२ हजारहून अधिक फॉलोवर्स आहेत.