मुंबई – राज्यात मान्सून दाखल झाला असून राज्यातील काही भागात बळीराज्याने पेरणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शेतातील पेरणी सुरु केली आहे. खुद्द एकनाथ शिंदे हे बादांवर गेले असून ते शेतात पेरणी करताना दिसत आहेत. त्यांच्या पेरणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/327652412256858/
या व्हिडीओमध्ये एकनाथ शिेंदे शेतात पेरणी करताना दिसत आहेत. मातीत राबत, सोबत काही मंडळींचे मार्गदर्शन घेत आपण पेरणी व्यवस्थित करत तर आहोत ना, याबाबतचे प्रश्न विचारत ते इथे पेरणी करताना दिसत आहेत. त्यांचा या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ भावला आहे.