कोयनानगर (वार्ताहर) – नवसंशोधक प्रदीप पाटील यांनी नुकताच लिहलेला संशोधनात्मक व गड-किल्ले संवर्धनास उपयुक्त असलेला ग्रंथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट देण्यात आला. मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी तरुण संशोधक प्रदीप पाटील यांना घेऊन मंत्री शंभूराज देसाई गेले.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड निवासस्थानावरून त्यांच्या गाड्यांचा ताफा वर्षाकडे खास एका इतिहास संशोधकाला ताकद देण्यासाठी निघाला होता. एका इतिहास संशोधकाला शंभूराज देसाई यांनी अशी ताकद दिली.
हा ग्रंथ व संशोधनाचे महत्व मंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदीप पाटील यांचे कौतुक करून नवसंशोधनासाठी महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे, असं सांगत एका नवसंशोधकाला आणि त्यांच्या कार्याला त्यांनी बळ दिले.
दरम्यान, ग्रंथााचा आवाका पाहून शासकीय दरबारी याची नक्की नोंद घेतली जाईल, असे आश्वासन देण्यास मुख्यमंत्री विसरले नाही. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला दरम्यान हा प्रकाशन सोहळा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडला होता या प्रकाशनाला शंभूराज देसाई यांनी भाषणात सांगितले होते,
कि आपण मुख्यमंत्रांना हा ग्रंथ भेट देऊ आणि प्रदीप पाटील यांच्या सारख्या संशोधकाला शासनाकडून जे काही पाठबळ गरजेच आहे ते मिळावं असं मी मंत्री या नात्याने हक्काने सांगेन.
अवघ्या दहा दिवसाच्या आत हा ग्रंथ मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मंत्री देसाईंचे आपला शब्द तर खरा केलाच पण एका संशोधकाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा कार्यतत्पर प्रतिनिधी म्हणून गड प्रेमी शिवप्रेमी यांच्या मधून मंत्री देसाईंचे सगळीकडे कौतुक होत आहे.