जामखेड (प्रतिनिधी) : नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर जळगाव महापालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची बदली झाली होती. कायम ‘प्रभारी मुख्याधिकारी’ व आव्हानात्मक असलेल्या जामखेड नगरपरिषदेला दंडवते यांच्या रूपाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला आहे.
बदलीनंतर आज (दि. १०,शुक्रवार) त्यांनी दुपारी पालिकेत पदभार स्वीकारला. याप्रसंगी नागराध्यक्ष निखिल घायतडक यांनी त्यांचे स्वागत केले. पदभारानंतर दंडवते यांनी अधिकार्यांसोबत चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी सुहास जगताप यांची (दि. ०८,बुधवार) बदली होऊन त्यांच्या जागी जळगाव महापालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची जामखेडच्या मुख्याधिकरीपदी बदली करण्यात आली. आज दुपारी मिनीनाथ दंडवते यांनी नगरपरिषेच्या मुख्याधिकारी पदाचा करभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्ष निखील घायतडक यांनी मुख्याधिकारी दंडवते यांचे स्वागत केले.
यावेळी नगरसेवक संदिप गायकवाड, ॠषीकेश बांबरसे, शामीर सय्यद, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन अशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख,विकास राळेभात, अर्शद शेख सह आदी उपस्थित होते.
नुतन मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांना शहरातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जामखेडकरांना योग्य सुविधा पुरविण्यासाठी त्यांना आपले प्रशासकीय कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.