पुणे: पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. आगामी सात दिवसांमध्ये कोणत्या सुविधा सुरु राहणार आहेत. कोणत्या सुविधा बंद राहतील याविषयी राव यांनी माहिती दिली.
पुण्यात काय सुरु काय बंद?
-
सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
-
मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
-
धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद
-
PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
-
आठवडे बाजारही बंद
-
लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
-
संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
-
केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
-
होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार
-
अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद
-
दिवसा जमाव बंदी, रात्री संचार बंदी
-
उद्याने सकाळी सुरू रहाणार
-
उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं…
-
शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार मात्र परीक्षा वेळेत होणार