नागरिकत्व कायदा तयार झाल्यानंतर देशातील ईशान्य भारतात हिंसाचार उसळला आहे. या कायद्याविरोधात विरीधात जनता रस्त्यावर उतरली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Lawyer Nizam Pasha to ANI: AIMIM leader Asaduddin Owaisi has filed a petition before the Supreme Court challenging the #CitizenshipAmendmentAct (file pic) pic.twitter.com/463ycBsjmk
— ANI (@ANI) December 14, 2019
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, वकील निजाम पाशा म्हणाले की, एमआयएमने नागरिकत्व दुरुसती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इंडियन यूनियन मुस्लिम लीगनेही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ओवेसी यांनी कायद्याला विरोध करत विधेयकाची प्रत लोकसभेत फाडली होती.