उत्तरप्रदेशात खोदकामाच्यावेळी सापडले कोट्यवधींचे सोने

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु आहे, दरम्यान, हे खोदकाम सुरू असताना चार किलो सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या काजीपूरा गावामध्ये ही घटना घडली. सोन्याचे दागिने सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी दागिने पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

काजीपूरा गावातील ग्रामस्थ मंदिर बांधण्यासाठी खोदकाम करत होते. त्याचवेळी जमिनीमध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये सोन्याचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत साधारण कोट्यवधी रुपये एवढी आहे. या घटनेची माहिती आसपासच्या गावामध्ये पसरताच नागरिकांनी दागिने पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना आणि महसूल खात्याला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन त्यांनी तपासाला सुरुवात केली. हे दागिने प्राचीन काळातले असल्याचे सांगितले जात आहे. या दागिन्यांमध्ये गळ्यातले दोन हार, बांगड्यायासह आणखी काही दागिने सापडले. घटनास्थळी अजूनही खोदकाम सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.