बेल्हे -अणे (ता. जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाची सध्या रेलचेल सुरू आहे. अणे गावात अखंड हरिनाम सप्ताह आणि सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असून, अखंड हरिनाम सप्ताह आणि सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असून, काकडा, भूपाळी, पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम दिवसभर आहेत.
आज शुक्रवार (दि. 27) आणि उद्या शनिवार (दि. 28) असे दोन दिवस राज्यातील प्रसिद्ध आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. यात्रेमध्ये आळेफाटा पोलिसांच्या वतीने गावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. श्री रंगदास स्वामी महाराज शतकोत्तर पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बहुजन विकास विचार मंच, अणे आणि प्रहार जनशक्तीचे श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने अणे येथे मंगळवारी (दि. 24) रमोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील हजारो नागरिकांना या शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिराला जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, अण्याचे सरपंच प्रकाश बोरा, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, पेमदराचे सरपंच रंगनाथ बेलकर, रामदास दाते, किशोर आहेर, दीपक आहेर, श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर अनेक मान्यवर उपस्थित होते.