मेस्सीसाठी मॅंचेस्टर सीटी लावणार करोडोंची बोली

लंडन – बार्सिलोनाकडून खेळत असलेला जागतिक स्तरावरचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला आपल्याकडे खेचण्यासाठी मॅंचेस्टर सीटी क्‍लब करोडोंची बोली लावणार आहे. यंदाच्या मोसमात फारशी चमकदार कामगिरी न झालेल्या मेस्सीबाबत बार्सिलोना करार वाढविण्याच्या तयारीत नसल्याने मॅंचेस्टरने त्याला आपल्याकडे घेण्यासाठी तब्बल 700 दशलक्ष युरोची (जवळपास 6 हजार कोटी रुपये) बोली लावण्याची क्‍लबची तयारी आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत बायर्न म्युनिककडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर मेस्सी व बार्सिलोना यांच्यात दुरावा आला होता, त्याचवेळी मेस्सीचा करार संपुष्टात आणला जाण्याचे संकेत बार्सिलोनाने दिले होते. त्यामुळे त्याला अपल्या क्‍लबकडे घेण्यासाठी मॅंचेस्टर उत्सुक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.