कबड्डीविजेता संघ बनणार कोट्यधीश

अहमदाबाद: प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाने अखेरीस आपल्या उत्तरार्धात प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर यंदाच्या हंगामाचे प्ले-ऑफ आणि अंतिम सामना रंगणार आहे.

सातव्या हंगामासाठी प्रो-कबड्डीच्या आयोजकांनी बक्षिसाच्या रकमेची घोषणा केली आहे. या हंगामासाठी एकूण 8 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम जिंकणाऱ्या संघाला 3 कोटी तर उप-विजेत्या संघाला 1.80 कोटी रुपये मिळणार आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या-चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संघांनाही रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे.

दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, यू मुम्बा, हरयाणा स्टिलर्स, बंगळुरू बुल्स आणि यूपी योद्धा या संघांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.