पती-पत्नीने घातला लाखोंना गंडा

कर्ज मंजूर न करताच घेतले 1 लाख 80 हजार

नगर -उद्योग व्यवसाय सुरु करण्यास जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्जप्रकरण मंजुर करुन देतो असे सांगून पती-पत्नीने वेळोवेळी 1 लाख 80 हजार रुपये घेऊन कर्ज मंजुर न करता तसेच पैसे माघारी देण्यास नकार देऊन फसवणुक केल्याची घटना जुलै 2018 ते ऑगस्ट 2018 दरम्यान वेळोवेळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत रविंद्र राठोड (वय 27, रा.मंगलमुर्ती अपार्टमेंट, भिस्तबाग, सावेडी) हा बेरोजगार असल्याने नोकरी व्यवसायाच्या शोधात होता, त्यास सुरज शशिकांत मेहेत्रे व पुजा सुरज मेहेत्रे (रा.फातीमानगर, हिंगमुल्लारोड, पुणे) यांनी त्यास उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आम्ही जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज प्रकरण मंजूर करुन देतो असे सांगून त्याच्याकडून वेळोवेळी सुमारे 1 लाख 80 हजार रुपये घेऊन त्याचे कर्जप्रकरण मंजुर केले नाही.

याबाबत त्याने विचारणा केली असता त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून अनिकेत याने दोघांकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन आपली फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच अनिकेत राठोड याने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अनिकेत राठोड याच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.