आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी फरताळे दिंडी ट्रस्टचे उपाध्यक्ष विष्णू रघुनाथ झोपे यांच्याकडून एक लाख रुपयाची मदत करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून झोपे यांनी एक लाखाचा धनादेश संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विष्णू झोपे यांसह फरताळे दिंडीचे सचिव कातोरे गुरूजी, खजिनदार सोपानराव राक्षे, विश्वस्त बहिरट महाराज उपस्थित होते.