मिलेनियम, अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशनला विजेतेपद

पुणे: 14 वर्षांखालील मुलींच्या गटात मिलेनियम संघाने बीव्हीबी संघाला तर मुलांच्या गटात अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशनने सिम्बायोसिसला पराभूत करत सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी आयोजित 25 व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर अंतिम फेरीच्या लढतीत मिलेनियम संघाने बीव्हीबी संघाला 25-8, 25-10 असे पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद साकारले. दुसऱ्या उपांत्य लढतीत मिलेनियम स्कूलने नालंदा हायस्कूल संघाला 25-5, 25-7 असे एकतर्फी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

14 वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशनने सिम्बायोसिसला 21-25, 32-30, 25-8 असे पराभूत करताना विजेतेपदावर आपली मोहोर लावली.

Leave A Reply

Your email address will not be published.