सहस्रक पिढीचे गुंतवणूक धोरण (भाग-1)
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक –
तुमच्या पगारातील किमान 15 ते 20 टक्के रक्कम दर महिन्याला म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवण्यासाठी बाजूला काढून ठेवा. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूक येणाऱ्या 10-15 वर्षात चांगला परतावा देणारी आणि उत्पादक स्वरुपाची ठरते. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) दरमहा फक्त रू. दोन हजारांची गुंतवणूक करत राहिलात आणि चक्रवाढीचा वार्षिक दर 12 टक्के राहिला तर 30 वर्षांनी तुमच्या हातात सुमारे 70,00,000 रुपये पडू शकतात. म्हणजेच इथे तुम्ही केवळ बचत करत नसता तरसंपत्ती निर्मिती करत असता.
बचत करायला शिका –
ती बचत तातडीच्या खर्चासाठी असो किंवा अनपेक्षित खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी असो, किती बचत करायची आणि कुठे गुंतवणूक करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. आज दरमहा गुंतवणूक करण्याची ठराविक रक्कम तुम्हांला खूप मोठी आणि आर्थिक ताण निर्माण करणारी वाटत असते ती चार-पाच वर्षात तुमच्यासाठी किरकोळ वाटणारी ठरते. त्यामुळे तुम्हांला योग्य वाटेल तेवढी रक्कम ठरवा आणि दरमहा गुंतवणुकीला सुरवात करा. गुंतवणुकीची शिस्त कधीही मोडू नका. कारण गुंतवणुकीतून परतावा हवा असेल तर त्यासाठी संयम आणि शिस्त हे दोन गुण अतिशय आवश्यक असतात. ते असतील तर दीर्घकाळातील गुंतवणूक तुमचा स्वतःविषयीचा अभिमान वाढवणारी ठरेल.
– चतुर