मिल्खा सिंग अनंतात विलीन

चंदिगढ  – भारताचे “फ्लाइंग सिख’ अशी ओळख असणारे प्रख्यात धावपटू आणि शेकडो खेळाडूंचे प्रेरणास्थान असणारे मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या 91 वर्षीय महानायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिज्जू यांचा समावेश होता.

मिल्खासिंग यांचे पूत्र आणि प्रख्यात गोल्फपटू जीव मिल्खासिंग यांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगढचे प्रसासक व्ही पी. सिंह बदनोरे, पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल, हरियाणाचे क्रीडामंत्री संदीपसिंग यांसह त्यांच्यावर अंतिम समयी उपचार करणारे डॉ. जगत राम यावेळी उपस्थित होते.

पोलिसांनी शोकधून वाजवून आणि हवेत गोळीबाराच्या फैऱ्या झाडून त्यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना दिली. भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या दंडाला काळी फित लावून या सर्वकालीन महान खेळाडूला आदरांजली वाहिली. पंजाब सरकारने या खेळाडूला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला.

मिल्खा यांच्या अंतीम प्रवासास त्यांच्या सेक्‍टर आठ मधील निवासस्थानापासून प्रारंभ झाला. सजवलेल्या वाहनांतून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. या लहानशा मार्गावर हजारो चाहत्यांनी अखेरचे चरणवंदन घेण्यात धन्यता मानली.

करोनाशी सुरू असणारी मिल्खासिंग यांची करोनाशी सुरू असणारी लढाई शुक्रवारी संपुष्टात आली. त्यांच्या पत्नी मिर्मल कौर यांचे रविवारी निधन झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.