कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस दुध खरेदी दरामध्ये दिंनाक १ फेब्रुवारी पासून दरवाढ करण्यात येणार आहे. गाय दुध दरामध्ये ३.५ फॅट आणि ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गायीच्या दुधाचा दर २७ रूपये वरून २९ रूपये इतका होणार आहे.
तसेच म्हैस दुध खरेदी दरामध्ये ७.० फॅट आणि ९.० एस.एन.एफ करीता एक रूपये सत्तर पैसे इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे म्हैस दूध खरेदी दर ४२. ३० पैसे वरून ४४ रुपये इतका होणार आहे. तसे परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत आले आहे.