मुंबईत महत्वाच्या ठिकाणी लष्करी जवान तैनात 

मुंबई – पाकिस्तानबरोबरचा तणाव शिगेला पोहचल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासमवेत पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महत्वाची रेल्वे स्थानके, विमानतळ आणि पश्‍चिम नौदल कमानच्या मुख्यालयाबाहेर निमलष्करी दलांच्या जवानंबरोबरच लष्करी जवानांना तैनात करण्यात आले आहे.

पश्‍चिम नौदल कमानसाठी हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. गरज भासल्यास खोल समुद्रात कारवाईसाठी कमान सज्ज आहे. तटरक्षक दल आणि नाविक पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मुंबई पोलिसांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत विविध ठिकाणी नाकाबंदी करून पोलीस वाहनांची कसून तपासणी करत आहेत. मुंबईला असणारा संभाव्य धोका ध्यानात घेऊन योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.