शोपियॉं मधील चकमकीत दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरात शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. जिल्ह्याच्या इमामसाहिब येथे ही चकमक घडली. त्यात तो मारला गेला असला तरी त्याची ओळख अजून पटलेली नाही. ही चकमक सायंकाळपर्यंत सुरू होती. उत्तर काश्‍मीरातील बारामुल्ला जिल्ह्यातही सोपोर येथे सुरक्षा दल आणि गनिमांमध्ये याचवेळी चकमक सुरू झाली.

मात्र त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. काश्‍मीरात सध्या मोठ्या प्रमाणात चकमकी झडत असून दहशतवाद्यांची एक मोठी यंत्रणा तेथे सक्रिय झालेली पहायला मिळत आहे. त्यांना स्थानिक लोकांचीही मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचे दिसून येत आहे. या संघटनांच्या सर्व बाजूने नाड्या आवळण्याचे काम सुरू असले तरी गनिमांकडून सुरक्षा जवानांना आव्हान देण्याचे काम सुरूच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.