उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वातावरण असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारत तिच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे अनेक स्तरावरुन संताप व्यक्त केला आहे
Kill rapists in public.
— Milind Usha Soman (@milindrunning) September 29, 2020
बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्याने “Kill rapists in public,”असं ट्विट केले आहे. या ट्विटवर महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
बलात्कऱ्याला मृत्यूदंड देणे हा यावरील उपाय ठरू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी आरोपीचं एन्काउंटर केलं होतं. पण त्यानंतर देखील गुन्हेगारांच्या मनांत भीती नाही असं एका महिलेनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.