मुंबई – शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता तिसरे नाव पान मसाल्याच्या जाहिरातीतही पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रमोशन सुरू केले आहे. त्यामुळे आता अक्षय चांगलाच अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमारने टीव्हीवर ‘बोलो केसरी..’ बोलल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी अक्षयच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
त्यानंतर काल अक्षयने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहत माफी मागितली आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा अक्षयला काही प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र अक्षय कुमार पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षयला पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.
@akshaykumar 👍 you made the right choice, whatever the reason !
— Milind Usha Soman (@milindrunning) April 21, 2022
मिलिंद आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की.., “अक्षय कुमार, तुझी निवड योग्यच आहे, मग त्याचं कारण काहीही असो.’ मिलिंद सोमणचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याशिवाय इतरही काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारला त्याच्या जाहिरात वादात पाठिंबा दिला आहे.
अक्षय कुमार त्याच्या माफीनाम्यात म्हणतो की..
“मला माफ करा. मी तुमची, माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणार नाही, तरीही विमल इलायची यांच्याशी असलेल्या माझ्या सहवासाच्या प्रकाशात तुमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल मी आदर करतो. सर्व नम्रतेने, मी मागे सरकतो.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
मी योग्य कारणासाठी संपूर्ण समर्थन शुल्क योगदान देण्याचे ठरवले आहे. माझ्यावर बंधनकारक असलेल्या कराराच्या कायदेशीर कालावधीपर्यंत ब्रँड जाहिरातींचे प्रसारण सुरू ठेवू शकतो, परंतु मी माझ्या भविष्यातील निवडी करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे वचन देतो. त्या बदल्यात मी कायम तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मागत राहीन.’ असं अक्षय कुमार म्हणाला.