Milind Deora on Rahul Gandhi । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. त्यातच प्रचाराच्या सभा घेण्यास आता सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे 6 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मुंबई राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे. यावरूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
काही महिन्यांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
आता निवडणुका आहेत त्यामुळेच… Milind Deora on Rahul Gandhi ।
राहुल गांधी आता ६ तारखेला मुंबईत दाखल होणार आहेत. यावरून मिलिंद देवरा यांनी, उद्या काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुंबईत येत आहेत. मी गेली 20 वर्ष मुंबईतल्या गणेशोत्सवासाठी या दिल्लीतील नेत्यांना बोलवत होतो. लालबाग राजा किंवा सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी नाही तर गिरगावमधील केशवजी नाईक चाळीतील पहिल्या गणपतीच्या दर्शनासाठीही ते आले नाहीत. आता निवडणुका आहेत त्यामुळेच येत आहेत. बाकी यांना काही पडलेली नाही”:अशी टीका त्यांनी यावेळी केली.
मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल Milind Deora on Rahul Gandhi ।
पुढे मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांचाही समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरेंविषयी बोलताना, वरळीच्या मतदारांना आदित्य ठाकरेंनी नाराज केलं, वरळीकरांना आदीत्य ठाकरेंनी खोटी स्वप्न फक्त दाखवली. त्यांचे वडिल मुख्यमंत्री होते, ते स्वत: मंत्री सोबत दोन परिषदेचे आमदार, दोन माजी महापौर असताना वरळीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. अनेक पुर्नविकासाचे प्रकल्प रखडलेले आहे. खर सांगायचं तर आदित्य ठाकरे हे विकास कामांसमोर स्पीड ब्रेकर म्हणून उभे राहतात. मुंबईतल्या सेंट्रल पार्कला विरोध, मेट्रोला विरोध असे अनेक विरोध आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूलथापांना जनता आता बळी पडणार नाही, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.