हॉलीवूडमधील गायिका आणि अभिनेत्री मायली सायरस आणि लियाम हेम्सवर्थ यांच्या लग्नाला आठ महिने पूर्ण झाले असतानाच मायलीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. या वृत्ताला मायलीचा प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे.
मायली सायरस आणि लियाम हेम्सवर्थ यांच्यातील रिलेशनशिपबाबत दिर्घ काळापासून चर्चा होती. तसेच लग्नांनंतरही हे कपल खूपच चर्चेत होते. आता दोघांमधील संबंध तुटण्याच्या मार्गावर आहे. गतवर्षी जीवनाचा एकत्रित प्रवास सुरु करणा-या या दोघांनी आता वेगवेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मायलीच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या एका ऑफिशल स्टेटमेंटमध्ये ही बात कन्फर्म करण्यात आली आहे. यात असेही म्हटले आहे की, मायली आणि लियाम हे दोघेही आपआपल्या करियरवर फोकस करू इच्छित आहेत. तसेच लोकांना आणि माध्यमांना दोघांच्या प्रायव्हेसीचा सम्मान करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मायली सध्या इटलीमध्ये ब्रॉडी जेनरची एक्स गर्लफ्रेंड कॅटलिन कार्टरसोबत सुटीचा आनंद घेत आहे. मायलीच्या विभक्त होण्याचा निर्णय समोर आल्यानंतर मायली आणि कॅटलिनचे फोटो व्हायरल होत असून दोघे डेटवर असल्याचे बोलले जात आहे.