सातारा (प्रतिनिधी)- कोयना धरण परिसरात आज सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी होती.
भूकंपाचे अंतर कोयनेपासून १३.६० किलोमीटर तर खोली ८ किलोमीटर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावाच्या ईशान्येस १० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली नाही.