मुलुंडमध्ये भाजपकडून यंदा मिहिर कोटेचा या नव्या चेहऱ्याला संधी

मुंबई – भाजपने आज 125 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये मुलुंडमधून यंदा भाजपाने नव्या उमेदवाराला संधी दिली आहे. मिहिर कोटेचा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुलुंडमधून तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये बरीच रस्सीखेच होती. जवळपास सहा जण तिकीटासाठी इच्छुक होते. मुलुंडमधून किरीट सोमय्या यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र भाजपने मिहिर कोटेचा या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.

२०१४ साली मिहिर यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी फक्त ८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही त्यांनी वडाळयामध्ये काम चालू ठेवले. मुलुंडमध्ये मोठया प्रमाणावर गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे भाजपाचा उमेदवार इथे सहज विजयी होतो. मिहिर कोटेचा हे मूळचे मुंलुंडचे असून ते गुजराती आहेत. त्यामुळे तिकीटासाठी त्यांचे पारडे जड मानले जात होते.

दरम्यान, माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा या मतदारसंघातून पत्नी मेधा सोमय्याच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होते. वरिष्ठ नेते प्रकाश गंगाधरे हे सुद्धा इथून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तारा सिंग आपला मुलगा रणजित सिंगसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मुलुंडचा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.