नगर – पुण्या-मुंबई सारख्या आयटी कंपन्या नगर शहरातही सुरु व्हाव्यात, त्यानिमित्ताने नगरच्या तरूणांना शहर सोडून न जाता येथेच चांगला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, नगर मधील एमआयडीसी येथे आयटी पार्क सुरू होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी (दि.17) रोजी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयडीसी येथे 2002 साली आयटी पार्क उभारण्यात आलेले आहे. मात्र अद्यापपर्यंत ते तसेच धूळखात पडून होते. नगर जवळच असलेले पुणे शहर हे आयटी हब म्हणून देशभरात ओळखले जात आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक युवक हे नोकरीसाठी पुण्यात स्थलांतरित झाले आहे. यामुळे नगर मध्येही आयटी पार्क सुरु करण्यासाठी प्रयत्न केले असून आता नगरमधील युवकांना येथेच रोजगार मिळणार आहे. यामध्ये सद्या सात ते आठ कंपन्या येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. काही आयटी कंपन्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार या कंपन्या महिनाभरात एमआयडीसी मध्ये कामकाज सुरु करण्यात आले आहे.