MI Eliminator Scenario : मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग 2026 मधील 16व्या सामन्यात (MI Eliminator Scenario) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ला 15 रनने पराभूत करून मोठा धक्का दिला आहे. हा विजय मुंबईसाठी टर्निंग पॉइंट ठरला असून, त्यांनी प्लेऑफच्या रेसमध्ये कमबॅक केलं आहे. आरसीबीचा सलग दुसरा पराभव आरसीबीने लीगच्या सुरुवातीला सलग पाच विजय मिळवले होते, पण आता सलग दोन पराभव (प्रथम दिल्ली कॅपिटल्सकडून आणि आता मुंबईकडून) पत्करावे लागले आहेत. या पराभवानंतरही आरसीबीचे 7 सामन्यांत 5 विजय आणि 10 गुण असून, ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहेत. त्यांचा नेट रनरेट +0.947 आहे. यामुळे आरसीबी थेट फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. मुंबई इंडियन्ससाठी मोठा दिलासा मुंबई इंडियन्सने (MI Eliminator Scenario) सलग तीन पराभवानंतर सातव्या सामन्यात तिसरा विजय नोंदवला. या विजयामुळे त्यांचे 7 सामन्यांत 3 विजयासह 6 गुण झाले असून, नेट रनरेट +0.146 आहे. मुंबईचा नेट रनरेट आता इतर टीम्सच्या तुलनेत सुधारला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले असून त्यांच्यात गुजरात जायंट्ससोबत तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी चुरस आहे. MI Eliminator Scenario मुंबईला एलिमिनेटर खेळायचा असेल तर… मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी किंवा एलिमिनेटर खेळण्यासाठी आगामी सामना (गुजरात जायंट्सविरुद्ध) जिंकणे अत्यावश्यक आहे. जर मुंबईने शेवटचा सामना हारला तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पण विजय मिळवल्यास आणि दिल्ली किंवा गुजरात यापैकी एकाने आपला पुढील सामना गमावल्यास, मुंबईला एलिमिनेटरमध्ये स्थान मिळवू शकते. या विजयाने मुंबई इंडियन्सची प्लेऑफची आशा जिवंत ठेवली असून, आगामी सामन्यांत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लीगचा शेवटचा टप्पा आता अधिक रोमांचक झाला आहे. हे पण वाचा : Shreyas Iyer : इशानपेक्षा ‘हा’ खेळाडूच सर्वोत्तम! वरुण अॅरॉनने निवडला तिलक वर्माचा परफेक्ट रिप्लेसमेंट