नवी दिल्ली : श्रीनगरमध्ये 27 फेब्रुवारीला आपणच पाडलेल्या आपल्या मीग 17 हेलिकॉटर प्रकरणात भारतीय हवाई दलाच्या दोन अधिकाऱ्यांवर कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर अन्य चार अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. त्यात दोन एअर कमोडर आणि दोन फ्लाइट लेफ्टनंट यांचा त्यात समावेश आहे.
आपणच केलेल्या माऱ्यात पडलेल्या हेलिकॉप्टरमध्ये हवाई दलाच्या सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका ग्रुप कॅप्टन आणि विंग कमांडरला कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे.
हवाई दल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच आरकेएस भदौरीया यांनी हे हेलिकॉप्टर पाडणे ही हवाई दलाची मोठी चीक असल्याचे वक्तव्य केले होते.या हेलिकॉप्टरमधून स्वाड्रन लिडर सिध्दार्थ वसिष्ठ, निनाद मांडवगणे, कुमार पांडेव, विक्रांत शेरावत, दीपक पांडेय आणि पंकज कुमार प्रवास करत होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.