करोनाबळींच्या संख्येत मेक्‍सिकोने टाकले ब्रिटनला मागे

जागतिक क्रमवारीत आता तिसऱ्या स्थानी

पॅरिस – मेक्‍सिकोमध्ये करोना संसर्गाने एका दिवसात सुमारे 700 बाधितांचा बळी घेतला. त्यामुळे तो देश करोनाबळींच्या संख्येत ब्रिटनला मागे टाकून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.

जगातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. जगभरात 1 कोटी 78 लाखांहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत सुमारे 6 लाख 84 हजार बाधित दगावले आहेत. जगातील सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद अमेरिकेत झाली आहे. त्या देशात 47 लाखांहून अधिक बाधित आहेत. अमेरिकेत करोनाबाधेने 1 लाख 56 हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. 

अमेरिकेपाठोपाठ ब्राझील जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशात 26 लाखांहून अधिक बाधितांची, तर 92 हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आता मेक्‍सिकोने बळींच्या संख्येत ब्रिटनला मागे टाकले आहे. त्या देशांत अनुक्रमे 46 हजार 688 आणि 46 हजार 119 बाधित दगावले आहेत. 

मात्र, ते देश बाधितांच्या संख्येत तुलनेने मागे आहेत. मेक्‍सिकोत सुमारे सव्वा चार लाख तर ब्रिटनमध्ये 3 लाखांहून अधिक बाधित आहे. त्या संख्येत ते देश जागतिक क्रमवारीत अनुक्रमे सहाव्या आणि अकराव्या स्थानांवर आहेत. 

जागतिक क्रमवारीत भारत बाधित संख्येत तिसऱ्या, तर बळींच्या संख्येत पाचव्या स्थानी आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे 1 कोटी 12 लाख बाधित करोनामुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.