मेक्सिको सिटी – मेक्सिकोच्या उत्तरेला एक प्रवासी बस आणि पेट्रोल टॅंकरच्या धडकेनंतर लागलेल्या आगीमध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोच्या उत्तरे सीमेजवळील तामाउलिपास प्रांतात शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. टॅंकरच्या दोनपैकी एका ट्रॉलीतून इंधनाच्या तेलाची गळती झाल्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.
या धडकेनंतर दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. प्रवासी बसचा तर केवळ लखंडी सांगाडा शिल्लक राहिल्याचे पोलिसांच्या फोटोंमध्ये दिसते आहे.
अपगाताच्या ठिकाणी पूर्णपणे जळालेले 9 मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र अधिक तपास केल्यानंतर बसमध्ये आणखीन 9 जळालेले मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांचा आकडा आणखीन वाडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
अपघातात तेलाच्या टॅंकरचा चालक बचावला आहे. त्याच्याकडे पघाताच्या कारणांची चौकसी करण्यात येते आहे. दोन ट्रोली असलेल्या टॅंकरमुळे मेक्सिकोमध्ये यापूर्वीदेखील अनेक अपघात होऊन गेले आहेत. या दोनपैकी एक ट्रॉली मोकळी सुटल्यामुळे हा अपगात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.