पुणे : लिव इन रिलेशन शिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेस त्रास देत असल्याच्या कारणावरून आज एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.
आज गोकुळ नगर, विश्रांतवाडी या ठिकाणी रात्री 01.30 वा सुमारास अक्षय गागोदेकर,वय 24 वर्षे रा मुंजाबा वस्ती,धानोरी याचा पाच जणांनी मिळून खून केला. दरम्यान, खुनातील सर्व आरोपीना अटक करण्यात आली आहे. इंद्रजीत गुलाब गायकवाड़ वय 23 वर्षे रा गोकुळ नगर,धानोरी , निलेश विश्वनाथ शिगवन वय 24 रा गोकुळ नगर,धानोरी, विजय कालूराम फंड, वय 25 रा सर्वेन्ट क्वाटर्स, खडकी, सागर राजू गायकवाड़ वय 17 रा सर्वेन्ट क्वाटर्स,खडकी, कुणाल बाळु चव्हाण वय 22 रा.बोपखेल, विश्रांतवाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. पुणे यांनी आरोपी क्रमांक 01 याचे बहिणीस लिव इन रिलेशन शिपमध्ये राहताना त्रास देतो या कारणावरुन दगडांनी मारहाण करून खून करण्यात आला होता.
सदर खुनातील आरोपींचा शोध घेत असताना यूनिट 04 चे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,पो हवा मचे,पो ना खुनवे, पो कॉ शेलार व विश्रांतवाडी पो स्टे 1+3 असे संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबवून वरील सर्व आरोपिंना ख्रिश्चन स्मशानभूमी, होळकर ब्रीज, खडकी या आर्मी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, पुढील कार्यवाही कामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.