वेतनासाठी मेट्रो कामगारांचा आज मोर्चा

आयुक्‍त कार्यालयावर धडक ः सामाजिक संघटना होणार सहभागी
कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच

पिंपरी – महामेट्रोने कामाचा ठेका दिलेल्या मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्‍ट प्रा. लि. या संस्थेने कामगारांचे मासिक पगार व पीएफ माहे डिसेंबर 2018 ते आजपर्यंत दिलेला नाही. तसेच काही कामगारांना कामावरून निलंबितही करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ कामगार व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर तसेच, शहरातील काही सामाजिक संघटनांनी प्रसिद्धीपत्रक काढून ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्याविरोधात कामगारांनी मोर्चा व आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एचसीसी अलफारा इन्फ्राप्रोजेक्‍ट या मेट्रो स्टेशनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे सुमारे 100 कामगार काम करतात. महामेट्रो रेल प्रोजेक्‍टचे ठेकेदार अल्फाइन्फ्राप्रोजेक्‍टच्या वल्लभनगर येथील कार्यालयाच्या समोर थकीत वेतनाच्या मागणीसाठी 1 जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या ठेकेदाराने 100 कामगारांना सहा महिन्यांपासून वेतन न देता केवळ एक दोन महिन्याचा पगार देऊन या कामगारांची बोळवण केली. त्यावेळी कामगार दिनी 1 मे रोजी या कामगारांनी उपोषण केले. त्यानंतर 3 मे रोजी या कामगारांना 35 लाख रुपये दिले. आता कामगारांचे उर्वरीत थकित 90 लाख रुपये मिळावे, यासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

संबंधित ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्यावर आर्थिक अफरातफर, विश्‍वासघात, फसवणूक बाबत पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये कामगारांनी तक्रार अर्ज दिला आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून महामेट्रो व संबंधित ठेकेदारांने हे आंदोलन गांर्भीयाने घेतले नसल्याने शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता महामेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर सोमवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता स्वारगेट येथील कामगार आयुक्‍त कार्यालयासमोर कामगारांचे आंदोलन होणार आहे. तरी शहरातील संघटीत असंघटीत कामगार व सामाजिक संस्थांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन मारुती भापकर, डॉ. सुरेश बेरी, सचिन देसाई, प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, सुजित चव्हाण आदींनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.