मेट्रोचे मजूर म्हणतात, ‘कामावर परत न्या’

गावाहून परतीच्या प्रवासाची सोय करण्याचे साकडे

पुणे – शहरातून लॉकडाऊनदरम्यान गावी परतलेले मेट्रोचे परप्रांतीय कामगार आता कामावर परतण्यासाठी उत्सुक आहेत. महामेट्रोकडे हे मजूर परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्याची विनंती करत आहे. हे मजूर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल आणि इतर राज्यातील आहेत, असा दावा मेट्रो अधिकाऱ्यांनी केला आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मेट्रोच्या 2,800 पैकी 1,500 कामगारांनी घरचा रास्ता धरला आहे. त्यामुळे मेट्रोकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गाच्या कामासाठी अवघे 1,300 कामगार राहिले आहेत. रेल्वे आणि बस सेवा बंद असल्याने “महामेट्रो’ने इतर राज्यांतील म्हणजे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल आणि इतर राज्यांतील विविध जिल्हा प्रशासनांना पत्रे लिहून या मजुरांना परत येण्याची व्यवस्था करण्याची विनंती केल्याची माहिती “महामेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे यांनी दिली.

सध्या जे मजूर पुन्हा कामावर परत येऊ इच्छित आहेत, त्यांची नेमकी आकडेवारी मिळाली नाही. मात्र, गावी परतलेल्या मजुरांकडे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसल्यामुळे त्यांना आता कामावर परत यायचे आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.