पुणे मेट्रोचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल

महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा दावा

पुणे – मेट्रो प्रकल्पाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापलिका हद्दीतील कामांनी वेग घेतला आहे. या वर्षाअखेर आम्ही पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू करणार आहोत. त्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल, असा दावा महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी मंगळवारी केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील खराडी आणि धानोरी भागात बापट यांची प्रचार फेरी काढण्यात आली होती. यामध्ये आमदार जगदीश मुळीक, योगेश मुळीक, संदीप जराड, बापूसाहेब कर्णे गुरुजी, संजय भोसले, अविनाश साळवे, अनिल टिंगरे, श्वेता गलांडे, राहुल भंडारे, मुक्ता जगताप, श्वेता चव्हाण, सुनीता गलांडे, हरझाना शेख, शीतल शिंदे, शीतल सावंत, किरण जठार, संतोष राजगुरू, आदी यावेळी उपस्थित होते.

कॉंग्रेस सरकारने मेट्रो भुयारी असावी, की जमिनीवरून? या वादातच 15 वर्षे व्यर्थ घालवली. या वर्षात पुण्याची लोकसंख्या वाढल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ लागला. भाजप सरकारमुळे हा प्रश्‍न तातडीने मार्गी लागला. पुणे आणि पीएमआरडीए मेट्रो अंतर्गत जवळपास 20 हजार कोटी रुपयांची कामे सध्या कार्यान्वित झाली आहेत. या कामांमुळे जनतेमध्ये नवा आशावाद निर्माण झाला असून, तीनही मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात सध्याच्या मंजूर झालेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करून पुढील टप्प्यात आम्ही विस्तारीकरणाचा निर्णय घेणार आहे. या विस्तारीकरणाचा फायदा खराडी भागातील आयटीयन्सला होईल, असे बापट यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.