कोलकाता – कोलकाता शहरातील मेट्रो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. गेली पाच महिने करोनामुळे ती बंद होती.
काल रविवारी केवळ नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली होती. पण आज संपूर्ण शहरातील ही सेवा पूर्ववत करण्यात आली.
पहिल्या दोन तासांत तीन हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला, अशी माहिती कोलकाता मेट्रोचे महाव्यवस्थापक मनोज जोशी यांनी दिली. सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तास ही सेवा सुरुवातीच्या टप्प्यात सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अन्य ठिकाणांप्रमाणेच येथेही करोनाविषयक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली जात आहे.