पुणे – पुण्यासह राज्यातील मेट्रो प्रकल्प दहा वर्षात पांढरे हत्ती होतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयामधील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले कि, पुण्यासह राज्यातील मेट्रो प्रकल्प दहा वर्षात पांढरे हत्ती होतील. त्याचा भार राज्य सरकारलाच उचलावे लागेल. त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा