पुणे – पुणे “मेट्रो कार्ड’साठी नाव सुचविण्याचे आवाहन महामेट्रोने पुणेकरांना केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून गेल्या सहा दिवसांत 576 नागरिकांनी नाव सुचविले आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. पुणे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्डला विशिष्ट नावाने ओळखले जाणार आहे.
“मेट्रो कार्ड’ला नाव देण्याची संधी पुणेकरांना देण्यात आली असून 16 नोव्हेंबरपर्यंत ती उपलब्ध असेल, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून contest@punemetrorail.org या ई-मेलवर आपले नाव, फोन नंबर व पत्ता यासह पाठवावी.
सुचविलेले नाव मराठी किंवा इंग्रजीमध्ये असावे. स्पर्धकाने सुचविलेल्या नावाचे महत्त्व सुस्पष्ट लिहून सादर करावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.