#MeTooUrbanNaxal ट्विटरवर ट्रेंड

आज ट्विटरवर भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणामध्ये नक्षली शक्तींना मदत केल्याच्या आरोपाखाली देशातील विविध भागातून जेष्ठ डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ #MeTooUrbanNaxal (मी देखील शहरी नक्षलवादी) हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी उद्भवलेल्या दंगलीमध्ये नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय पुणे पोलिसांना असून त्यांनी एल्गार परिषदेला उपस्थिती लावलेल्या डाव्या विचारवंतांचा नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून अटक सत्र सुरु केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी वर्नन गोसांल्विस, वरवरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज व गौतम नवलाखा यांना देशाच्या विविध भागांमधून अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी भीमा-कोरेगाव दंगलीच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेमध्ये नक्षलवाद्यांचा पैसा वापरला असल्याचा संशय देखील पोलिसांनी बोलून दाखवला होता. मात्र कार्यक्रमाच्या आयोजकांकडून पोलिसांद्वारे जाणून-बुजून प्रकरणाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)