वॉशिंग्टन – करोनाविषाणूच्या फैलावामुळे पसरलेल्या कोविड महामारी महासंकटाच्या कारणामुळे भारतासारख्या देशांमध्ये यावर्षी दिवाळीत जमिनीवर फटाक्यांची आतषबाजी होणार नसली तरी आकाशात उल्कावर्षावाच्या आतषबाजीचा योग आला आहे नोव्हेंबर महिन्यात या अनेकवेळा हा आनंद घेता येणार आहे एकाच वेळी हजारो उल्का अवकाशातून तुटून जमिनीवर जमिनीवर पडणार असल्याने त्याचा वेगळाच नजारा लोकांना पाहायला मिळणार आहे.
या महिन्यात 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी आणि त्यानंतरही काही दिवस उल्कावर्षाव पाहिला मिळेल, असा अंदाज आहे अमेरिकन मेटीओर सोसायटीने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे दिलेल्या माहितीप्रमाणे हा उल्कावर्षाव होताच आकाश प्रकाशमान होईल एका तासाच्या कालावधीमध्ये शेकडो उल्का अवकाशातून तुटून जमिनीच्या जमिनीच्या देशाने झेपावतील असा अंदाज आहे.
या सोसायटीने दिलेल्या माहितीप्रमाणे 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी अवकाश प्रेमींना तब्बल एक तास उल्कावर्षावाचा प्रकाशमान आनंद घेता येईल अवकाशात जास्त सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश असताना तेवढा आनंद घेता येणार नाही त्यामुळे साधारण पहाटेच्या वेळेस उल्कावर्षाव अतिशय चांगल्या पद्धतीने पाहता येणार आहे.
आकाशातील लिओ आणि तौरस या तारा मंडळाच्या दिशेने पाहिल्यास हा उल्कावर्षाव अनुभवास येणार आहे आकाश प्रेमींनी जमिनीवर झोपून आकाशाच्या दिशेने पाहिले तर हा उल्कावर्षाव अधिकच आकर्षकपणे अनुभवता येणार आहे अशी माहितीही या सोसायटीने दिली आहे