सांगवी (वार्ताहर) : जुनी सांगवीतील पवनानगर येथील ड्रेनेज गेल्या वीस दिवसापासून तुंबले आहे. परिणामी नजीकच असलेल्या हातपंपातून मैलामिश्रित पाणी येऊ लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ड्रेनेज लाईन तुंबल्याबाबत महापालिकेला वारंवार कळविण्यात आले. मात्र, महापालिकेकडून याबाबत चालढकल करण्यात येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, शेजारील हातपंपातून मैलामिश्रित पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरिक वापरण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा २५ वर्षापासून वापर करत आहेत. आता हेच पाणी मैलामिश्रित येऊ लागल्याने, तसेच एक दिवसाआड पाणी येत असल्याने वापरण्यास पाणी नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एवढेच नाही, तर परिसरात दुर्गंधी सुटली आहे. तसेच डासांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. दिवसापासून येत आहे. वारंवार संबंधित विभागाला कळविले, पण कायमस्वरूपी कोणतीही उपाययोजनाच नाही.
आयुक्तांना निवेदन देऊन भेट घेतली. संबंधित अधिकारी शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता यांच्यासोबत बैठकही झाली. लवकरात लवकर काम करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. काम लवकरात लवकर न झाल्यास मनसेकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
– राजू सावळे, मनसे शहर उपाध्यक्ष