कायद्यामुळे मेस्सी बार्सिलोनाबरोबरच

माद्रिद – बार्सिलोना क्‍लब सोडून आणखी मोठ्या रकमेचा करार करण्याचे लिओनेल मेस्सीची योजना अखेर फसली आहे. क्‍लबशी झालेल्या कराराचा भंग केला तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो हे लक्षात आल्याने त्याने पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत बार्सिलोनाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

मेस्सीसारखा अत्यंत महागडा खेळाडू संघात असतानाही क्‍लबला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत असल्याने मेस्सीच्या गुणवत्तेवरच शंका घेतली जाऊ लागली होती. याला कंटाळून मेस्सी क्‍लबशी असलेला करार मोडणार होता. मात्र, करारातील तरतुदींनुसार मेस्सीला बार्सिलोनाकडूनच खेळावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.