ब्युनोस आयर्स – बार्सिलोना संघाकडून खेळत असलेला अर्जेन्टिनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी लवकरच क्लबला बायबाय करणार आहे. खुद्द मेस्सीनेच हे संकेत दिले आहेत.
2010 सालापासून बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या मेस्सीचा संघासोबतचा करार जून 2021 पर्यंत आहे. मेसीने क्लब सोडणार असल्याचे जाहीरपणे सांगितले नसले तरी संघव्यवस्थापनाच्या निर्णयांबाबत त्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने आता यांचा काडीमोड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे