मेस्सी आणि नेयमार येणार आमने सामने

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनशी लढत

बार्सिलोना  – लिओनेल मेस्सी आणि नेयमार या जागतिक फुटबॉलपटूंमधील स्पर्धा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मेस्सीचा बार्सिलोना संघाचा सामना नेयमारच्या पॅरिस सेंट जर्मेनशी (पीएसजी) होणार आहे. 

साखळी स्पर्धेपाठोपाठ या दोन संघात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होत असून या दोन खेळाडूंमधील चुरस चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. हे दोघेही खेळाडू आधी बार्सिलोना या एकाच संघात खेळत होते. मात्र, नेयमारने यंदाच्या मोसमात पीएसजीशी करार केला व बार्सिलोनाची ही बलाढ्य जोडी फुटली.

आता दोन भिन्न संघांकडून खेळताना एकमेकांसह पूर्वी खेळल्यामुळे त्यांना एकमेकांची बलस्थाने व कमकुवत दुवे चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामुळे या दोन खेळाडूंमधील वर्चस्वाची लढाई चांगलीच गाजणार आहे.

चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून बार्सिलोनाची लढत पीएसजीशी होणार आहे. बार्सिलोनाने पीएसजीला तीन वर्षांपूर्वी या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभूत केले होते. त्याचीच पुनरावृत्ती बार्सिलोना करणार हा उत्सूकतेचा विषय बनला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.