नगर – नोकरीचे आमिष दाखवून 20 जणांकडून 1 कोटी 26 हजार घेवून त्यांना नोकरीवर लावले. नंतर या सर्वांना नोकरीवरून काढून टाकले. याप्रकरणी भिंगार येथील श्री सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा संस्थापक सुभाष साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे यांच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी नेवासा येथील रमेश गोरख चक्रनारायण यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षक, सहशिक्षक, ग्रंथपाल, शिपाई या पदावर पैसे घेउुन नोकरीवरुन लावून पगार न देता 2007 पासून सुमारे अकरा वर्ष काम करून घेतले. व आता संस्थेतून काढून टाकले.
या कर्मचाऱ्यांची फसवणूक केली. या कर्मचाऱ्यांकडून सुभाष बन्सी साळवे,खजिनदार अनिता सुभाष साळवे यांनी नोकरीवर लावण्यासाठी 1 कोटी 26 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली.
या कर्मचाऱ्यांना काढून टाकून त्यांच्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची भरती केली. याप्रकरणी रमेश चक्रनारायण यांच्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात सुभाष व अनिता साळवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील हे करत आहेत.