पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 75 सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी महापौर म्हणाले की, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शहराची सेवा केली आहे. त्यामुळे, आज पिंपरी-चिंचवड शहर उत्तम शहर म्हणून नावलौकिकास येत आहे.
मे 2019 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य मोरेश्वर भोंडवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी प्रदीपकुमार मुथा, राजीव जाधववार, राजेश जगताप, उपअभियंता अंकुश कोंडे, सहा. आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांचा समावेश आहे.