व्हाट्‌सऍपवरील मेसेज सुरक्षित?

नवी दिल्ली – व्हाट्‌सऍपवरील मेसेज पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा व्हाट्‌सऍप कंपनीने केला आहे. यासाठी इंड टू इंड इन्क्रीप्टेड व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे हे मेसेज फक्त पाठवणारा आणि घेणारा या दोघांनाच माहीत होतात. बॉलिवूडमधील काही चित्रपट तारकांच्या व्हाट्‌सऍपवरील मेसेज लिक झाल्यानंतर या संदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाच व्हाट्‌सऍप कंपनीने ही स्पष्टीकरण केले आहे.

मेसेज पाठवणारा आणि पाहणारा या दोघांशिवाय ही माहिती कोणालाही नसते. व्हाट्‌सऍप कंपनीलाही ही माहिती नसते, असे या कंपनीच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

त्याने असे सांगितले की, व्हाट्‌सऍप वापरणाऱ्यांनीही आपले मॅसेज सुरक्षित राहतील या संदर्भात आवश्‍यक ती काळजी घ्यावी. यासाठी योग्य पासवर्ड, बायोमेट्रिक आयडी इत्यादींचा वापर करावा म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला हे मेसेज दिसणार नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.