मुंबई: राज ठाकरे ईडीच्या चौकशीला जात असताना परिवरासोबत निघाले होते. त्यावर अंजली दमानिया यांनी ”राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला?” अशी टीका केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच ट्रॉल केले आहे. त्यावर राज ठाकरे घरी गेल्यांनतर दमानिया यांनी मेसेज करून कार्यकर्त्यांनी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल तुम्हाला काय वाटते? असे विचारले आहे.
दरम्यान दिवसभर अनेक कार्यकर्त्यांचे कॉल आणि मेसेज आले असल्याचे दमानिया यांनी या मेसेज मध्ये म्हटले आहे. तसेच अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ट्रॉल केले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी लोकशाहीत राहते आणि मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे असा मॅसेज त्यांनी राज ठाकरेंना केला आहे. या पाठवलेल्या मॅसेजचा स्क्रीन शॉट काढत त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच तुम्ही अनेकांना भाषणात अस्वल म्हणता तर अनेकांची टिंगल उडवता मग फक्त एवढ म्हटलं तर काय बिघडल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
मनसे च्या कार्यकर्त्यांनी आज जे अतिशय असभ्य trolling केलं, त्यावर मी राज ठाकरे यांना पाठवलेला मेसेज pic.twitter.com/qk5wYjHWkm
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019