हडपसर (प्रतिनिधी) : सन्मित्र सहकारी बँक नेहमीच गुणवंत मुलांना दिशा देण्याचे काम करीत आहे.हे सहकार क्षेञात नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. हडपसर येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या वतीने आयोजित गुण गौरव समारंभात ते बोलत होते.
बँक गेली अनेक वर्षे बँकेच्या सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत पाल्यांचा सन्मान करत आहे. याही वर्षी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये हा गुण गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना गौरविण्यात आले. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प असे सत्काराचे स्वरूप होते.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी विधानपरिषद सदस्य जगन्नाथ शेवाळे ,सन्मित्र बँकेचे अध्यक्ष सुनिल गायकवाड ,उपाध्यक्ष भरतलाल धर्मावत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. संचालक गणेश फुलारे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष भरतलाल धर्मावत यांनी आभार मानले.