मुंबई – अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या आगामी ८३ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरु असतांनाच रणवीर सिंह त्याच्या बाथरूम सिंगिंग व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
या व्हिडीओत रणवीर शॉवर घेत बाथरूममध्ये डान्स करताना दिसत आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ( DDLJ )या चित्रपटामधील मेरे ख्वाबों में जो आए या गाण्यावर रणवीर मजेदार डान्स करताना दिसत आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये ओरिजनल गाण्यात अभिनेत्री काजोलनं जसे एक्सप्रेशन देत मोहक डान्स केला होता. त्याचप्रमाणे डान्स करतांना तसेच कॉमेडी एक्स्प्रेशन देताना रणवीर दिसत आहे. सध्या रणवीरचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा एनर्जेटीक अॅक्टर रणवीर सिंग लवकरच १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार या चित्रपटातून पडद्यावर मांडला जाणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटामध्ये 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. एप्रिल 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त आर. बद्री, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, पंकज त्रिपाठी या कलाकारांचाही समावेश आहे.