नवी दिल्ली : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यावेळी सर्वात मनोरंजक दृश्य राज्यसभेत पहायला मिळाले, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी नूतन सभापती जगदीप धनखर यांचे भव्य स्वागत केले.
खरगें यांनी सुरुवातीला धनखर यांचे कौतुक केले आणि नंतर शेर वाचून त्यांना टोलादेखील लगावला. धनखर यांचे कौतुक करताना खरगे म्हणाले की, तुम्ही भूमीचे पुत्र आहात, तुम्हाला संसदीय परंपरा चांगल्या प्रकारे समजतात. तुम्ही राजस्थान विधानसभा आणि पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल राहिले आहेत. तुम्हाला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे, तुमची रूपरेषा खूप मोठी आहे. तसेच राज्यसभेचे पालक म्हणून तुमची भूमिका इतर भूमिकांपेक्षा खूप मोठी आहे, असे मला म्हणायचे आहे. तुम्ही ज्या आसनावर बसलात त्यावर अनेक मान्यवर बसले आहेत.
पुढे बोलताना खरगें यांनी जगदीप धनखर यांना शेर सुनावला. खरगे म्हणाले की, ”मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब मेरा वक्त भी बदलेगा मेरी राय भी बदलेगी”। . खरगे यांच्या शेर नंतर उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी हसून आभार मानले.
दरम्यान, राज्यसभेत पीएम मोदींनी नवीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी या सभागृहाच्या तसेच देशाच्या वतीने अध्यक्ष (उपराष्ट्रपती) यांचे अभिनंदन करतो. संघर्षातून जीवनात पुढे जाऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, ही देशातील अनेकांसाठी प्रेरणा आहे. पीएम मोदी म्हणाले की, आमचे उपराष्ट्रपती हे एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत आणि ते सैनिक शाळेत शिकले आहेत. त्यामुळे जवान आणि शेतकरी यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. तसेच, मला विश्वास आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला वारसा पुढे नेईलच पण नवीन उंचीही देईल.असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.